साहेब पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने झळकावले बॅनर

नाशिक । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच शपथविधी होताच आता भुजबळ यांनाच नाशिकचे पालकमंत्री करावे अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात होर्ल्डिंग झळकवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून नाशिक जिल्हयाचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकलेला नाही. १७ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे दादा भुसे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असतांना आता भुजबळांची एन्ट्री झाल्याने पालकमंत्री पदाचा तिढा वाढला आहे.

त्यातच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी साहेब पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा ! असे बॅनर झळकवल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत बोलतांना खैरे म्हणाले, भुजबळ यांनी सर्वाधिक वेळा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविल्याने त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे. सन 2027 मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा होत असून यामुळे जागतिक पातळीवर नाशिकचे नाव चर्चिले जाणार आहे.

भुजबळ हे पालकमंत्री असताना कुंभमेळा झाला होता यात त्यांनी केलेले यशस्वी नियोजन व विकासकामे आज ही आठवणीत आहे. मागील कुंभमेळयात पालकमंत्री नसताना देखील त्यांनी अनेक कामे केल्याचे निदर्शनास येते. कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजना संदर्भात भुजबळानी विभागिय आयुक्तांना वेगवेगळ्या विषयांवर पत्राद्वारे मार्गदर्शन सुचना केल्या आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी सर्वाधिक सात जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अजित पवार गटाने विजय मिळवला असून सर्वाधिक आमदारांचा जिल्हा बनला आहे.

त्यामुळे दूरदृष्टी ठेऊन नाशिक जिल्ह्याचा योग्य विकास व कुंभमेळयाचे यशस्वी नियोजनाकरिता छगन भुजबळ यांनाच पालकमंत्री पद मिळावे अशी सर्व नाशिककरांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!