नाशिक । छावा संघटनेच्या पदाधिकारयांना राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीविरोधात नाशिकमध्ये छावा क्रांती संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत रोष व्यक्त केला. सुरज चव्हाणचा तात्काळ राजीनामा घ्या आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाल्याने राज्यभरात छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कृषीमंत्र्यांचा निषेध नोंदवत छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी पत्ते फेकल्याने राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष सूरज चव्हाण आक्रमक झाले होते. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकार्यांना मारहाण केली.
या निषेधार्थ छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले. सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आशिष हिरे,नवनाथ शिंदे,योगेश गांगुर्डे,विजय वाहूळे, आबा पाटील,सागर जाधव,योगेश पाटील,बबलू पाटील,अमोल शिंदे, मनोरमा पाटील,सविता वाघ,संगीता सूर्यवंशी,अमोल खांदवे,शुभम महाले,योगेश अहिरे,विशाल घागस,अमोल देवरे,राहुल भालेराव,समाधान पाटील आणि असंख्य छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
छावा क्रांतिवीर सेनेला शांततेची भाषा समजते,पण अन्यायाच्या विरोधात उठून उभं राहणे हेच आमचे ब्रीद आहे.तुम्ही गप्प राहाल,तर आम्ही पेटून उठू! सुरज चव्हाणचा तात्काळ राजीनामा घ्या आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करा.अन्यथा छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्या पक्षावर राहील.
करण गायकर, संस्थापक अध्यक्ष,
छावा क्रांतीवीर संघटना











