नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भुजबळ यांच्याकडे आता कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल अन्न व नागरी पुरवठा खात भुजबळ कडे दिले जाईल अशी चर्चा होती. अखेर त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. दोन महिन्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मुंडे यांच्याकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा खात कोणाकडे जाणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागून होती.
तूर्तास तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व पुरवठा खात हे स्वतःकडेच ठेवलं होतं मात्र छगन भुजबळ शपथविधी झाल्यानंतर मुंडे यांच्याकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा खात भुजबळांकडे जाईल अशी चर्चा होती.
20 मे रोजी छगन भुजबळ यांच्या शपथविधी झाला मात्र त्यांना खाते देण्यात आलेले नव्हतं त्यामुळे आता भुजबळ यांच्याकडे मुंडे यांच्याकडे असलेल्याच खाते दिले जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवली आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्रा अद्याप सुटू शकलेला नाही भुजबळ यांच्या एंट्रीमुळं आता पालकमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. परंतु भुजबळ यांनी पालकमंत्री पदाचा वाद न वाढवता जे कोणी पालकमंत्री असतील त्यांच्याकडून आपण नाशिकच्या विकासाची काम करून घेऊ असं आश्वासन नाशिककरांना दिले











