Digital Payment : स्मार्ट फोनवरूनच मिळवता येणार रोख रक्कम काय आहे प्रणाली

मुंबई । सध्या सर्वच व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे एटीएममधून रक्कम काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहिलेली नाही. परंतु तरीही अनेकदा रोख रकमेची आवश्यकता भासते. त्यामुळे अनेकदा आपल्याला एटीएमवर पैसे काढण्यासाठी जावे लागते. मात्र आता तुम्हाला थेट स्मार्ट फोनवरूनच रोख रक्कम मिळवता येणार आहे. याकरिता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याकरिता एक प्रस्ताव तयार केला आहे.

या प्रस्तावानुसार देशातील २० लाखांहून अधिक बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सच्या आउटलेट्सवर युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बिझनेस कॉरस्पॉन्डंट्स हे स्थानिक एजंट असतात जे एटीएम किंवा बँकेच्या शाखा नसलेल्या दुर्गम भागांमध्ये बँकिंग सेवा पुरवतात.

अशी असेल प्रणाली
या प्रणालीनुसार तुम्हाला बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सच्या आउटलेटवर जाऊन फक्त QR कोड स्कॅन करायचा आहे. तुमच्या फोनवरील कोणतेही UPI प वापरून तुम्ही हा कोड स्कॅन करू शकाल आणि तुमच्या खात्यातून पैसे काढू शकाल. यामुळे एटीएममध्ये जाण्याचा किंवा डेबिट कार्ड वापरण्याचा त्रास वाचेल.

किती पैसे काढता येणार?
नवीन प्रस्तावानुसार बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सच्या आउटलेटवर एका व्यवहारात दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम काढता येईल. सध्या काही निवडक एटीएम आणि दुकानांमध्ये UPI द्वारे पैसे काढण्याची सुविधा आहे पण त्यावर शहरात एक हजार रुपये तर गावांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंत मर्यादा आहेत.

error: Content is protected !!