नाशिक-शहराची स्कायलाईन विकसित करण्यामध्ये इंटेरियर डिझाईनर्स व वास्तूविशारद यांना महत्वाचे स्थान असून शहर विकासाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये इंटेरियर डिझाईनर्स व वास्तूविशारद यांनादेखील शासनाने स्थान द्यावे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंटेरियर डिझाईनर आर्की.रणजीत वाघ यांनी केले.ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझाईनर्सच्या (आय आय आय डी)नाशिक शाखेच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून हकीम सिन्नरवाला यांच्या नेतृत्वाखाली नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.कार्यक्रमासाठी आयआयआयडीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आर्की. सरोश वाडिया हेदेखील उपस्थित होते. रणजीत वाघ पुढे म्हणाले,जगातील विविध देशात काम केल्यानंतर आपल्या देशात काम करतांना एक वेगळीच अनुभूती येते आणि आपल्या देशात काही नवीन वेगळे निर्माण करण्याचा आनंदही मिळत आहे असेही त्यांनी नमूद केले.
पदभार स्वीकारतांना नूतन अध्यक्ष हकीम सिन्नरवाला म्हणाले, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासाठी डिझाईन दृष्टीकोनाने बर्याच गोष्टी करता येऊ शकतात.यासाठी नाशिकमधील सर्वच इंटेरियर डिझाईनर्स उत्सुक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अशी आहे नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष-हकीम सिन्नरवाला, भावी अध्यक्ष-अनिल राका,उपाध्यक्ष -जितूभाई पटेल,मानद सचिव -प्रसाद गणोरे, कोषाध्यक्ष-सुरुची रणदिवे,सहसचिव- सागर काबरे,कार्यकारिणी सदस्य- स्मिता वाणी,गिरीश बटाविया,आयपीपी -अतुल बोहोरा, सहयोगी सदस्य -शीतल साखला , अभिजित कोठारी, शाल्मली गायधनी, मुस्तनसीर मोगरावाला, श्रुती गुप्ता,केदार देवी , मिहिर मेहता, सुदीप लोढा, निष्ठा कारखानीस, नताशा परसाई, दीपक पंजाबी, हर्षल कुंभार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य -वैशाली प्रधान











