नाशिकमध्ये आणखी एका फर्निचर दुकानाला भीषण आ
नाशिक । शहरात फर्निचर दुकांनांना लागणार्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, शुक्रवारी सायंकाळी संभाजीनगर रोडवरील शिवाई फर्निचर या दुकानाला भीषण आग लागली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास तपोवनातील प्लायवूडच्या दुकानाला आग लागली होती ही घटना ताजी असतांनाच ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे.
आग लागण्याचे कारण अस्पष्ट सदर आगीचे नेमके कारण सध्या स्पष्ट झालेले नसून, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, अधिकृत कारणांची चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. आगीच्या तीव्रतेमुळे शेजारच्या इमारतींनाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती, मात्र सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
बघ्यांची मोठी गर्दी
ही घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी गर्दी हटवून बचावकार्य सुरळीत सुरू ठेवले.










