नाशिक । अजित पवारांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला असून, त्यांना क्लीन चीट मिळते. मात्र, छोट्या शेतकर्यांना कर्जमाफी मिळत नाही हे दुर्दैवी आहे अशी टिका करत छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने शिर्डी येथे बैलगाडी मोर्चा काढत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.पवारांचा राजीनामा घ्या, अन्यथा राज्यभर मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी बोलतांना करण गायकर म्हणाले, शेतकर्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वाचा असून, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे शेतकर्यांची चेष्टा करतात. शेतकर्यांचा अपमान करणार्या या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. अजित पवारांनी जर माणुसकी शिल्लक असेल तर शेतकर्यांची माफी मागावी किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे गायकर म्हणाले. यावेळी विजय वाहुळे, सुभाष गायकर, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोके, आशिष हिरे, अविनाश शिंदे, संदीप राऊत, विठ्ठल भुजाडे, वैभव दळवी, अमोल शिंदे, दत्ता पवार, दादासाहेब जोगदंड, शिवम शिंदे, आकाश गाडे, संदीप वाघ, अनिल मंजुडे, शिवाजीराजे चौधरी, तुषार गोंदकर, राहुल शिंदे, राहुल दुसाने, निमदेव हिरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.










