Ajit pawar : अजित पवार उद्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार २० एप्रिल रोजी नाशिक दौर्‍यावर येत असून ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. या दौर्‍या दरम्यान दुपारी१२: वाजता ते नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच नाशिकमध्ये पक्षाची बैठक घेत असल्याने ते पदाधिकार्‍यांना काय मार्गदर्शन करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


सकाळी ९ ः४० वा. त्यांचे इगतपुरी येथे त्यांचे आगमन होणार आहे. येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून सकाळी १०: वा. ते नाशिक येथे त्यांचे आगमन होईल. पाथर्डी फाटा येथे एका विवाह सोहळयाला उपस्थिती लावल्यानंतर ते १२: वा.राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाची बैठक घेणार आहेत. नाशिकमध्ये नुकताच उध्दव ठाकरे गटाचा निर्धार मेळावा झाला. त्यानंतर सध्या राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे त्यामुळे एकूणच राजकीय घडामोडींबाबत अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही अजित पवार हे नेहमीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नाशिक दौर्‍यात ते राजकीय घडामोडींवर भाष्य करतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!