नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा हा रद्द झालेला आहे हेलिकॉप्टर मध्ये झालेल्या बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्या असल्याचे सांगण्यात येते
विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी नाशिक दौऱ्यावर येणार होते त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत होता. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादा नाशिक मध्ये प्रथमच पक्षाची बैठक देखील घेणार होते. त्याचप्रमाणे विविध उद्घाटन सोहळे विवाह सोहळ्यांना देखील त्यांची उपस्थिती लावणार होते. परंतु हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानकपणे अजित पवार यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.










