नाशिकमध्ये मिळणार परवडणार्‍या दरात गणेश मूर्ती

नाशिक । सणासुदीच्या काळात नागरिकांची आर्थिक बचत व्हावी या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील ज्येष्ठ नागरिक व त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते ना नफा, ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ हिरावाडी रोडवरील त्रिमूर्ती नगर येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिक व मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जात असून यंदाचे हे ६ वे वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षापासून युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीने परिसरात अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. पारंपारिक सण साजरे करत असतांना बचत व्हावी. या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घेऊन अधिक माहितीसाठी सागर तांबे यांच्या सोबत संपर्क करावा असे आवाहन अंबादास खैरे यांनी केले.

यावेळी दिनकर लोहकरे, अरविंद सोनवणे, बाबुभाई पटेल,शैलेश शिवणकर,मनोहर आव्हाड, विजय घुगे, उदय सराफ, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, अशोक पाटील,राम शिंदे,राज रंधवा,रोहित जाधव, विनायक जाधव, प्रकाश आव्हाड,, यांच्या समवेत परिसरातील नागरिक व त्रिमूर्ती नगर सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!