सोग्रस फाट्याजवळ अपघात – मंत्री भुसे धावले मदतीला

चांदवड – मालसाणे–सोग्रस फाटा परिसरात शुक्रवारी सकाळी शाळकरी मुलांचा दुर्दैवी अपघात झाला. यावेळी नाशिकहून मालेगावकडे जात असलेले शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली.

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, चांदवड येथे हलविण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी पिंपळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना वेळेत मदत मिळावी म्हणून ना. भुसे यांनी स्वतः दुचाकीवर बसून ॲम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला. त्यांनी दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांना सर्वतोपरी व तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. या वेळी मंत्री भुसे घटनास्थळीच उपस्थित राहून नागरिकांची समजूत काढली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

या प्रसंगी आमदार राहुल आहेरही उपस्थीत होते. त्यांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.


error: Content is protected !!