महाराष्ट्रदिनी नाशिकमध्ये होणार अनोखा ‘विश्वविक्रम’

‘तुळसी’च्या अनोख्या संकल्पनेवर आधारित विश्वविक्रम सोहळा

नाशिक । १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये एका वेगळ्याच प्रकारचा आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडणार आहे. जीएस फाउंडेशनच्या वतीने ‘वीरासन’ करत एक अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार करण्यात आला असून, या उपक्रमामार्फत योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. १ मे रोजी गंगापूर रोड येथे सकाळी ९ वाजता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचे महत्त्व अधोरेखित करत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सुरू केला. तेव्हापासून जगभरात योगप्रती जनजागृती झाली आहे. आता योग हा केवळ व्यायाम न राहता, आरोग्यवर्धन आणि मानसिक शांततेचा प्रभावी मार्ग बनला आहे. याच भावनेतून महाराष्ट्र दिनी ‘वीरासन’ या विशेष योगस्थितीतून एकत्रितपणे सहभागी होऊन सर्वात मोठा सामूहिक वीरासन करण्याचा विक्रम घडवणार आहेत.

या उपक्रमात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, योग शिक्षक, महिला, वयोवृद्ध अशा विविध वयोगटातील नागरिक सहभागी होणार आहेत. आयोजनासाठी नाशिकमधील प्रमुख योग संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा-कोलेजेस आणि नागरिकांचा मोठा सहभाग मिळत आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणार
हातात तुळशी घेऊन वीरासन पोझ
महिलांना नउवारी साडी, पुरूषांना पारंपारिक वेशभूषा
प्रत्येक स्पर्धकाला तुळशीचे रोप
प्रमाणपत्र, मेडल, भेटवस्तू
वर्ल्ड रेकॉर्ड नोंद झाल्यावर अधिकृत प्रमाणपत्र देखील दिले जाईल

येथे करा संपर्क
जीएस फाउंडेशनच्याच्या वतीने गंगापूर रोड येथे होणार्‍या या कार्यक्रमात योग आणि भारतीय संस्कृतीचा संगम अनुभवता येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7769051655, 9607519166 या क्रमांकावर संपर्क करून आपले नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यावश्यक आहे. वीरासन हे योगातील एक शक्तिशाली आसन असून, हे आसन करताना आत्मप्रेरणा, एकाग्रता आणि अनुशासन यांचा संगम घडतो. या विशेष कार्यक्रमात ‘वॉरियर्स पोझ (वीरासन)’ करत हातात ‘तुळसी’ घेऊन उभे राहणार्‍या हजारो सहभागींच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा उद्देश आहे.
ज्योती कुटे, आयोजक

error: Content is protected !!