नाशिक । दरवर्षी देश-विदेशातील बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिरांमध्ये दीपावली पाडव्यां निमित्त भव्यदिव्य अन्नकूट उत्सवाचे आयोजन करण्यात येते, ह्या उत्सानिमित्त पाडव्याच्या दिवशी भगवान स्वामी नारायणाला११०० विविध शाकाहारी व्यंजनांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला
सकाळी स्वामीनारायण भगवान यांची विधीवत महापूजा करून स्वामीनारायण मंदिरातील अन्नकोठ नैवेद्य आधी गोवर्धन पूजा करून भगवानाला भोग अर्पण करण्यात आला
ह्या प्रसंगी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरातील प्रत्येक भगवंताला विविध पदार्थांचे भोग अर्पण करण्यात आले आणि हे भोग आकर्षण पद्धतीने भगवंतासमोर रचण्यात आले होते.
हे भोग विशेष म्हणजे मंदिरातच बनवले जातात आणि ह्याकरता पंधरा दिवस आधी मंदिर संस्थेच्या वतीने तयारी करण्यात येते. सोबत मंदिरात येणारे काही भक्तगण देखील मोठ्या प्रमाणात आपला आपला नैवेद्य घेऊन येत असतात.यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली.
याप्रसंगी स्वामीनारायण मंदिराचे महंत महाव्रत स्वामी, बीबीए नयन स्वामी,आनंद विहारी स्वामी, यग्न स्वरूप स्वामी ,गौरव मुनी स्वामी,अमित पटेल यांच्या सह विविध साधू महंत उपस्थित होते.
याप्रसंगी आलेल्या सर्व भाविकांनी भंडार्याचा आस्वाद देखील घेतला मंदिराच्या वतीने आज भव्य दिव्य असे भंडार्याचे देखील आयोजन करण्यातआलेहोते.











