नाशिकच्या नेत्यांना मातोश्रीवर पाचारण, पण हा नेता अनुपस्थित !

नाशिक । सुधाकर बडगुजर यांच्या हकालपटटीनंतर नाशिकमधील शिवसेनेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच ठाकरे गटाच्या नाशिकच्या सर्व पदाधिकार्‍यांना शुक्रवारी मातोश्रीवर पाचारण करण्यात आले मात्र, यावेळी महानगरप्रमुख विलास शिंदे अनुपस्थित असल्याचे चर्चेला उधाण आले आहे.

सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आपण पक्षात नाराज असल्याचे सुतोवाच केल्याने शिवसेनेतील नाराजी समोर आली. त्यामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतांनाच पक्षाने तातडीने बडगुजर यांची पक्षातून हकालपटटी केली.

या कारवाईनंतर नाशिकच्या सर्व पदाधिकार्‍यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले. यात शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी.सुर्यवंशी, सुनील बागुल, माजी आमदार वसंत गिते, उपमहानगरप्रमुख बाळा दराडे आदी पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले मात्र शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे अनुपस्थित असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

बडगुजर यांनी विलास शिंदे यांचे नाव घेत शिंदे हे देखील पक्षात नाराज असल्याची प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळयाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असल्याचे विलास शिंदे शिंदे गटात जाणार या चर्चेला उधाण आले असतांनाच ठाकरे गटाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मात्र विलास शिंदे उपस्थित होते.

परंतू आपण आपली भूमिका योग्यवेळी मांडू अशी सूचक प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केल्याने आता शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान ते आपल्या कौटुंबिक कारणास्तव मातोश्रीवर उपस्थित राहू शकले नाही अशी ही माहिती समोर येत आहे

error: Content is protected !!