पंचवटीत वाड्याला भीषण आग

नाशिक – शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या एका जुना वाड्याला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशामक विभागाला कळवले. सूचना मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांनी आपापल्या घरांमधून बाहेर येत परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे वाड्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकार्‍यांकडून आगीचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला जात आहे.

error: Content is protected !!