डीपीडीसीसाठी ३०० कोटींचा निधी प्राप्त : प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Dpdc nashik

नाशिक । जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 साठी सर्वसाधारण योजनेसाठी ९०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून यापैकी ३० टक्के निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पावसाळयापूर्वी संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामांसाठी तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेऊन प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत चौधरी बोलत होते. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चौधरी यांनी सांगितले की, सन मध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी ९०० कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेसाठी ४४३.४५ कोटी रुपये आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०१ कोटी रुपये एवढा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. अपूर्ण कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीची आणि दायित्व मागणीची परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, जिल्हा विकास आराखड्यांतर्गत सन २०२५: २०२६ साठी १९० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला असून, या निधीतून अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी निर्देशित केले. चौधरी यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याचे निर्देश दिले असून, संबंधित विभागप्रमुखांनी यासाठी योग्य नियोजन करण्याचेही आवाहन केले.

error: Content is protected !!