दगडफेकप्रकरणी ३९ आरोपींना न्यायालयीन कोठडी

नाशिक – शहरातील काठी गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३९ जणांपैकी ३७ जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यासोबतच याआधी अटक करण्यात आलेले उर्वरित दोन आरोपी देखील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्व ३९ जणांना पुढील १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेच्या दिवशी, अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या विरोधात जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत ३१ पोलीस कर्मचारी आणि काही अधिकारी जखमी झाले होते. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली होती.

या घटनेमुळे नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.

error: Content is protected !!