पूर्वपरवानगीशिवाय वर्गणी घेतल्यास दहा हजारांचा दंड

नाशिक : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील महत्त्वाचे गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पूर्वपरवानगी शिवाय वर्गणी घेतल्यास दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीत धर्मदाय आयुक्त ने विविध सूचना दिल्यात. विविध उपनगरे, कॉलनी, सोसायट्यांच्या परिसरात तात्पुरत्या गणेशोत्सवकाळात तात्पुरते मंडळ स्थापन केले जाते. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिसरातून जेव्हा वर्गणी गोळा करतात तेव्हा उत्सव पार पडल्यानंतर खर्चाचा हिशोबदेखील कार्यालयास सादर करणे कायद्याने अनिवार्य असते, हे लक्षात घ्यावे. पूर्वपरवानगीशिवाय मंडळांनी वर्गणी गोळा केल्यास किमान दहा हजारांचा दंड धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून केला जाऊ शकतो, असे नाशिकचे धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये मिरवणुक नंबर वरून वाद सुरू झाल्याने हे शिबिर आटपते घेण्यात आले. पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी करत पुन्हा बैठक घेतली मात्र, यामध्ये देखील काहीही तोडगा न निघाल्याने तुम्ही आता आपापसात ठरवून निर्णय घ्या अशा सूचना मंडळ पदाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर धर्मादाय सहआयुक्त महावीर जोगी, धर्मादाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार, सहायक धर्मादाय आयुक्त अनामिका मोताळे-पोरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण उपस्थित होते.

error: Content is protected !!